esakal | Nagpur By Election : प्रचारतोफा थंडावल्या
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Election : प्रचारतोफा थंडावल्या

Nagpur By Election : प्रचारतोफा थंडावल्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचार आज थंडावला. शेवटच्या दिवशी उमेदवारांनी रॅलीच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. जि.प.च्या १६ व पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी मंगळवारी ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर सहा तारखेला मतमोजणी होईल.

गेल्या एक-दीड आठवड्यांपासून सुरू असलेल्या प्रचार व प्रचार सभांमधून होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरींना आता पूर्णविराम लागला आहे. अनेक उमेदवारांनी बाईक रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले.आज शेवटच्या दिवशी जवळपास सर्वच सर्कलमध्ये बड्या नेत्यांसह सर्व उमेदवारांनी मतदारांना आपल्याला निवडून देण्यासाठी जोरदार गळ घातली. आज प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्यामुळे सगळ्याच पक्षांनी रॅली आणि रोड शोवर भर दिला.

मंगळवारला मतदान होणार असल्याने सोमवारला छुप्या बैठकांवर उमेदवारांचा जोर राहणार आहे. ६.१६ लाख मतदार बजावणार हक्क या निवडणुकीत ६ लाख १६ हजार १६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात २ लाख ९६ हजार ७२१ स्त्री मतदार व ३ लाख १९ हजार २९२ पुरुष मतदार आहेत. १११५ मतदान केंद्रावर निवडणूक होणार असून, १११५ कंट्रोल युनिट व १११५ बॅलेट युनिटची गरज भासणार आहे. ३३४५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले. सोमवारला सर्व साहित्य केंद्रावर पाठविण्यात येतील.

पावसाने घातले प्रचारावर विरजण

आज जि.प.व पं.स.च्या निवडणूक लढण्याऱ्या उमेदवाराचा प्रचारावर अखेरच्या अखेरच्या दिवशी जोरदार पावसाने विरजण घातले.पाऊस कमी झाल्यानंतर नेत्यांनी आपला प्रचाराला सुरुवात केली. रविवारी प्रचारतोफा थंडावल्या. शेवटच्या दिवशी सर्व राजकीय पक्षांनी आपापले शक्तीप्रदर्शन केले. रामटेक तालुक्यात बोथिया पालोरा या तालुक्यातील बोथाया पालोरा या जि.प.निवडणुकीत पचरंगी लढत होणार असून थेट लढत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, गोंडवाणा गणतंत्र पार्टी यांच्यात होणार असे दिसते.

loading image
go to top