नागपूर : चिखलीची पोरं बोलली थेट जर्मनीच्या तज्ज्ञांशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Zilla Parishad School Students communicate Germany experts

नागपूर : चिखलीची पोरं बोलली थेट जर्मनीच्या तज्ज्ञांशी

कोंढाळी : काटोल तालुक्यातील दुर्गम असलेल्या कोंढाळी जवळील चिखली ( मासोद) येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी थेट जर्मन भाषेत जर्मनीत कार्यरत तज्ज्ञांशी गुगल मिटद्वारे संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच जर्मनीला भेट दिली. ही बातमी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दूरदर्शनवर बघितली. तेव्हापासून त्या मुलांच्या मनात अनेक प्रश्नांचे वादळ निर्माण झाले. त्यांच्या मनातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शिक्षकांनी थेट जर्मनीत त्यांचा संवाद घडवून आणला. ‘क्राउस माफाय वेगमन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेत डेव्हलपमेंट इंजिनीअर या पदावर असलेले भारतीय व नागपूर येथील समीर कुंभारे आणि आर.वी.वर्सिचेरूंग कंपनीत अकाउंटिंग एक्सपर्ट म्हणून कार्यरत असलेल्या तेजस्विनी कुंभारे यांच्याशी ‘गुगलमीट’ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी थेट मराठी भाषेत चर्चा घडवून आणली. एक तास रंगलेल्या या चर्चासत्रात दोघांनीही चिमुकल्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधान होइपर्यंत उत्तरे दिलीत. विद्यार्थ्यांनी त्यांच्याजवळ जर्मन भाषा शिकण्याची इच्छा व्यक्त केली.

विद्यार्थ्यांचे आत्मविश्वासपूर्ण प्रश्न ऐकून दोघांनीही त्यांचे कौतुक केले. याप्रसंगी रूपचंद राठोड, अनिल कुंभारे, रवींन्द्र पवार, सुनीता झाडे या शिक्षकांनी सहभाग घेतला. भारतात आल्यानंतर चिखली जिल्हा परिषद शाळेला भेट देण्याचे आश्वासन या तज्ज्ञांनी दिले. यावेळी अनुकूल परसोडकर, धनश्री हजारे या चिमुकल्यांनी आभार व्यक्त केले.

विमानाच भीती नाही का वाटत?

चिमुकल्यांनी या चर्चासत्रात तेथील शिक्षणपद्धती, तुम्हाला जर्मन भाषा शिकताना कोणत्या अडचणी आल्या, तेथील चलन कोणते, विमानात भीती वाटत नाही का, अशा असंख्य प्रश्नांचा भडिमार केला. चिमुकल्या विद्यार्थ्यांना कुंभारे यांनी त्यांच्याच भाषेत म्हणजे मराठीत उत्तरे देऊन समाधान केले.

Web Title: Nagpur Zilla Parishad School Students Communicate Germany Experts Through Google Meet

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top