Nagpur Teachers News : ५ नोव्हेंबरचे आश्वासन अपूर्ण; जिल्हा परिषद प्रशासनाच्या दिरंगाईवर शिक्षक नाराज

Nagpur Teachers Pending Demands : नागपूर जिल्हा परिषद शिक्षकांच्या २१ प्रलंबित मागण्यांवर अद्याप निर्णय झालेला नाही. ५ नोव्हेंबरपर्यंत निवडश्रेणी आणि पदवीधर वेतनश्रेणीचे आदेश काढण्याचे आश्वासनही मुदतीनंतर अपूर्ण राहिले आहे.
Nagpur Teachers Pending Demands

Nagpur Teachers Pending Demands

esakal

Updated on: 

नागपूर: शिक्षकांच्या प्रश्नांवर आंदोलन झाले, प्रशासनाने उपोषणस्थळी येऊन लेखी आश्वासनही दिले; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी जिल्हा परिषद प्रशासनाने हात वर केल्याचे चित्र आहे. साखळी उपोषणादरम्यान ५ नोव्हेंबरपर्यंत निवडश्रेणी व पदवीधर वेतनश्रेणीचे आदेश काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मुदत संपूनही आदेश निघाले नसल्याने शिक्षकांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे शिक्षकांमधील असंतोष उफाळून आला असून, २१ प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी होत आहे.

Loading content, please wait...