esakal | ZP Election 2021 : नागपुरात भाजपला मोठा धक्का, बावनकुळेंचे कट्टर समर्थक पराभूत
sakal

बोलून बातमी शोधा

chandrashekhar bawankule

नागपुरात भाजपला मोठा धक्का, बावनकुळेंचे कट्टर समर्थक पराभूत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : नागपुरात जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी मतदान होत आहे. हळूहळू निकालाचे कल हाती येत आहेत. आतापर्यंत ९ जागांचे कल हाती आले असून नागपूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसची आघाडी दिसतेय. सध्या ६ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच २ जागेवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, जिल्हा परिषदेचे भाजपचे सर्वात महत्वाचे उमेदवार अनिल निधान यांचा गुमथळा गटातून पराभव झाला आहे. त्यामुळे हा भाजपला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

अनिल निदान हे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कट्टर समर्थक आणि जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आहेत. ते गुमथळा गटातून निवडणूक लढवित होते. ते भाजप समर्थित उमेदवार होते. मात्र, काँग्रेसच्या दिनेश ढोले यांनी दणदणीत विजय मिळवून निदान यांचा पराभव केला आहे. तसेच आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार नागपूर जिल्हा परिषदेमध्ये ६ जागांवर काँग्रेसने विजय मिळविला असून फक्त एका जागेवर भाजपला विजय मिळविता आला आहे. भाजपच्या मिनाक्षी सरोदे यांचा २४०० मतांनी विजय झाला आहे.

हिंगणा तालुक्यातील निलडोह-वडधामना जि.प. गटातून काँग्रेसच्या संजय जगताप यांचा ५७४६ विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या राजेंद्र हरडे यांना पराभूत केले आहे. कुंदा राऊत या देखील विजयी झाल्या आहेत.

नागपूर जिल्हा परिषदेतील आतापर्यंत विजयी उमेदवार -

  • हिंगणा (डिगडोह ): संजय जगताप (काँग्रेस)

  • मौदा (अरोली) : योगेश देशमुख (काँग्रेस)

  • काटोल (येणवा): समीर उमप (शेकाप)

  • कामठी(गुमथळा): दिनेश ढोले (काँग्रेस)

  • नागपूर (गोधनी): कुंदा राऊत  (काँग्रेस)

  • रामटेक (बोथीया पालोरा): हरीश उईके (गोंगापा )

  • कामठी (वडोदा): अवंतिका लेकुरवाळे (काँग्रेस)  

  • काटोल (पारडसिंगा): मीनाक्षी संदीप सरोदे (भाजपा)

  • पारशिवनी (करभाड ): अर्चना भोयर (काँग्रेस)

loading image
go to top