नागपूरकरांचे सेलिब्रेशन घरातच

उपराजधानीत कोरोनाचा वाढता आलेख व ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका वाढू लागला आहे.
Nagpurkar celebration at home
Nagpurkar celebration at homesakal

नागपूर : उपराजधानीत कोरोनाचा वाढता आलेख व ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका वाढू लागला आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमुळे (गाईडलाइन्स) नागपूरकरांनी कुठेही जल्लोष, उत्साह अथवा डिजेवर थिरकताना दिसले नाही. गतवर्षीप्रमाणेच यंदाही नववर्षाचे सेलिब्रेशन घरातच करावे लागले. त्यामुळे तरुणाईच्या उत्साहावर विरजण पडले. (growing graph of the Corona and the threat of the Omicron)

Nagpurkar celebration at home
नागपूर जिल्ह्यात महिनाभरात ३४५ कोरोनाबाधित

नववर्ष म्हटले की शहरात जागोजागी पार्ट्या आणि प्रचंड जल्लोष असतो. मात्र यंदा असे कोणतेच चित्र पाहायला मिळाले नाही. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे महापालिका प्रशासनाने नागरिकांना गर्दी न करता कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत घरांमध्येच साधेपणाने नववर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला नागपूरकरांनी सकारात्मक प्रतिसाद देत चार भिंतीच्या आडच टीव्हीवरील कार्यक्रम पाहून थर्टी फर्स्ट साजरा केला. कारवाईच्या भीतीपोटी अनेकांना पार्टीचे बेत आखले होते. त्यासाठी दोन दिवसापासून तयारीही सुरु केली होती. मात्र, प्रशासनाने अचानकच पार्ट्यांवर निर्बंध आणल्याने सर्वच कार्यक्रम रद्द करावे लागले. (Nagpurkar celebration at home)

Nagpurkar celebration at home
नितीन राऊतांच्या सूचनेला केदारांचा विरोध; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मतभेद उघड

त्यामुळे एरवी हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, ढाबे व शहराच्या आजूबाजूच्या रिसॉर्टवर दिसणारी झुंबड दिसून आली नाही. शिवाय रस्त्यांवरही पोलिसांचा बंदोबस्त चांगला असल्याने सर्वत्र शुकशुकाट जाणवला.ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनानेही जय्यत तयारी केली होती. शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. स्वतः पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. त्याउपरही नियमभंग करणाऱ्या काही मद्यपींविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र एकूणच नागपूरकरांचे नववर्ष सेलिब्रेशन फटाक्यांच्या आतषबाजीत पण अत्यंत शांततेत पार पडले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com