नागपूर : आयआयटी-होमच्या अमेय टिपले या विद्यार्थ्याने जेईई मेन २०२५ मध्ये राखीव श्रेणी यादीत अखिल भारतीय रँक (एआयआर) पाचवा क्रमांक मिळविला आहे. देशातील टॉप एक हजार मध्ये ७ क्रमांक मिळवला आहे. जेईई मेन २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला. .अमेय टिपले रामदासपेठ येथील आयआयटी-होम येथे जेईई मेन्स आणि अॅडव्हान्स्डची तयारी करीत होता. अमेय टिपलेने दिव्यांग श्रेणीत एआयआर १० व्या क्रमांकावर आला आहे. त्यांच्यासोबत मृण्मय उरकुडे (एससी एअर ३०७), केतन भारशंकर (एससी एअर ३३३), श्रेयन चावरे (एससी एअर ५०४), चिराग बोरकर (एससी एअर ६६३) आणि संकल्प मलकापुरे (ओबीसी-एनसीएल-एअर ६७५), अमोघ गोतमारे एअर १४१६ मिळविणारा हा आयआयटी-होम मधून सामान्य श्रेणीच्या यादीत टॉपर आहे. त्यांच्यानंतर युवराज ओबेरॉय एअर २३६४ आणि संकल्प मलकापुरे एअर ३४६३ मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहे..आयआयटी-होममधील एकूण १११ विद्यार्थ्यांनी जेईई मेन २०२५ मध्ये चांगली कामगिरी केली आहे. १८ मे रोजी जेईई ॲडव्हान्स्डसाठी बसण्यास पात्र ठरले आहेत. जेईई मेनसाठी पात्र होण्यासाठीचे कट-ऑफ एनटीएने जाहीर केले आहेत. सामान्य श्रेणी यादीसाठी ९३.१ टक्के आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७९.४३ टक्के आहेत. एकूण १२९ विद्यार्थी जेईई मेनसाठी शेवटपर्यंत संस्थेत तयारी करत होते. आयआयटी-होम विद्यार्थ्यांचे यशाचे प्रमाण ८६ टक्के आहे. जे आयआयटी-होमच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप जास्त आहे..आयआयटी-होमच्या व्यवस्थापकीय संचालक निशा कोठारी म्हणाल्या की, आयआयटी-होमच्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर आनंदी आहे. संस्थेचे प्रशिक्षण, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे चांगले फळ मिळाले आहे. जेईई ॲडव्हान्स्ड २०२५ मध्ये आणखी चांगल्या निकालाची आपल्याला आशा त्यांनी व्यक्त केली आहे. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.