
नागपूर : नागपूरच नव्हेतर संपूर्ण विदर्भात होमिओपॅथीचे भीष्म पितामह अशी ओळख असणारे शहरातील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. विलास डांगरे यांना केंद्र सरकारने पद्मश्री सन्मान शनिवारी घोषित केला. यामुळे शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. डॉ. डांगरे यांनी तब्बल पाच दशकात एक लाखावर रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत.