

नागपूर : महायुतीचे सर्वाधिक आमदार निवडून आले आहेत. सत्ता स्थापन करण्याइतके संख्याबळ त्यांच्याकडे आहे. असे असतानाही मुख्यमंत्र्यांना शपथ घेण्यासाठी तेरा दिवस लागले. हे बघता महायुतीमध्ये सारे काही आलबेल असे दिसत नसल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी केली.