

Nagpur
esakal
भिवापूर: भिवापूर तहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कारगाव येथील मंडळ अधिकारी नरेश कुंभलकर यांना शासकीय कामकाजात निष्काळजीपणा व कार्यालयीन शिस्तभंग केल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ४ जून रोजी जारी केले असून त्यांच्या विरोधात विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे.