Infrastructure Push: Roads Connecting Nashik to Be Developed SoonSakal
नागपूर
Nitin Gadkari: नाशिकला जोडणाऱ्या रस्त्यांचा होणार विकास; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नितीन गडकरींनी दिली मान्यता
Nashik Road Development : नाशिकला जवळपास महत्त्वाचे आठ मार्ग येतात. यात मुंबई, गुजरात, पालघर, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे या मार्गाने भाविक येतात. हे सर्व मार्ग कुंभच्या काळामध्ये महत्त्वाचे आहेत. याला जोडून नाशिकमधील व जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते देखील राष्ट्रीय महामार्गाला जोडले जाणार आहेत.
नागपूर : नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याला भाविकांची होणारी अलोट गर्दी होणार आहे. त्यामुळेच वाहतूक व्यवस्थेसंदर्भात लागणाऱ्या रस्त्यांच्या सुविधा, आवश्यक रस्त्यांची निर्मिती ही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत करण्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्त्वतः मान्यता दिली. याबाबत लवकरच ‘डीपीआर’ करून त्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल, असा निर्णय नाशिक सिंहस्थ कुंभमेळा बैठकीत घेण्यात आला.