
सिंदखेड राजा : नव्या पिढीला घडवण्यासाठी, तिला सुसंस्कारीत करणे काळजी गरज आहे. देशामध्ये साक्षरता वाढली आहे. परंतु, समाज सुसंस्कारित झाला आहे का, हा प्रश्न विचारवंतांना विचारला गेला पाहिजे. नवी पिढी संस्कारांच्या दिशेने पाठविणे, त्यांना मूल्य शिक्षण देण्याचे काम करणे आताच्या परिस्थितीत आवश्यक असल्याचे प्रतिपादन गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी मंगळवारी (ता. २० मे) मातृतीर्थ सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) येथे आयोजित राष्ट्रीय महासत्संग मेळाव्यात केले.