Navratri Festival 2023 : खापा शहरातील ३०० वर्षे जुन्या भवानी मंदिरात नवरात्रोत्सव

खापा बाजार चौकातील भवानी मातेचे मंदिर हे राजे भोसले काळातील आहे.
navratri festival 2023 khapa king bhosale era 300 years old bhavani temple celebrate
navratri festival 2023 khapa king bhosale era 300 years old bhavani temple celebrate Sakal

खापा : नवरात्री उत्सव जवळ अवघ्या तीन दिवसांवर आला असून शहरातील उत्सव मंडळांच्या वतीने नवरात्री उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. खापा शहरातील प्रसिद्घ बाजार चौकातील भवानी माता मंदिरात व कन्हान नदी काठावरील माऊली माता मंदिरात मंडळाच्या वतीने नवरात्री उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.

खापा बाजार चौकातील भवानी मातेचे मंदिर हे राजे भोसले काळातील आहे. या प्राचीन मंदिराची स्थापना आजपासून ३०० वर्षांपूर्वी खुबाळा गावातील सावरकर कुटुंबाने केली होती. २००१ मध्ये पुन्हा ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष पुरुषोत्तम रामचंद्र बोंदरे यांच्या नेतृत्वात मंदिराच्या जिर्णोद्घार करण्यात आला.

navratri festival 2023 khapa king bhosale era 300 years old bhavani temple celebrate
Navratri 2023 : नीरजाने शोधलाय फुटपाथ स्कूलचा नवा फॉर्म्युला, कचरा द्या आणि शिक्षण घ्या

गेल्या ३०० वर्षांपासून मंदिरात नवरात्रोत्सवात घटस्थापना केली जाते. यासाठी मंदिर कमिटी तयारीला व सजावटीच्या कामाला लागली आहे. या नऊ दिवसात शहरासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने मातेच्या दर्शनासाठी येतात.

navratri festival 2023 khapa king bhosale era 300 years old bhavani temple celebrate
Navratri 2023 : शारदीय नवरात्रोत्सवाआधी घरात आणा या वस्तू, आदिलक्ष्मीच्या कृपेने घर होईल ‘धन-धना-धन’

मंदिर परिसर विकासापासून वंचित

हे मंदिर प्राचीन असूनही हा परिसर विकासापासून वंचित आहे. कोराडीची आई जगदंबा येथील आई भवानी या बहिणी असल्याची भक्तांची मान्यता आहे. ३०० वर्षाचा मंदिराला इतिहास असतानाही अद्याप पर्यटनस्थळाचा दर्जा मिळालेला नाही. शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे मंदिर परिसर आजही विकासापासून वंचित आहे. कोराडी देवी मंदिराच्या धर्तीवर प्राचीन भवानी माता मंदिर परिसराचीही उभारणी करावी, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com