Nagpur: नवतपाच्या पहिल्याच दिवशी चटके; ब्रह्मपुरीचा पारा ४७.६ तर, नागपूर ४६.५ अंशांवर

Severe Heatwave Grips Vidarbha: नवतपाच्या पहिल्याच दिवशी विदर्भात उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळाली. ब्रह्मपुरीचे तापमान ४७.६ तर नागपूरचा पारा ४६.५ अंशांवर पोहोचला.
Nagpur

Nagpur

esakal

Updated on

नागपूर : सूर्याच्या रौद्ररूपामुळे नवतपाच्या पहिल्याच दिवशी नागपूरकरांसह वैदर्भीयांनाही जोरदार चटके सहन करावे लागले. उन्हाच्या भीषण लाटेमुळे सोमवारी विदर्भातील कमाल तापमानाने मोठी उसळी घेतली. उपराजधानी नागपूरमध्ये पारा उच्चांकी ४६.५ अंशांपर्यंत गेला, तर सध्या 'हॉट सिटी' बनलेल्या ब्रह्मपुरीचा पारा तब्बल ४७.६ अंशांवर झेपावला. प्रादेशिक हवामान विभागाचा रेड, ऑरेंज व यलो अलर्ट पाहता या आठवड्यात उन्हाचा तडाखा आणखीन वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com