Vijay Wadettiwar : ‘खाण सुरू किंवा बंद होण्याशी काहीही संबंध नाही’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vijay wadettivar

‘खाण सुरू किंवा बंद होण्याशी काहीही संबंध नाही’

नागपूर : नक्षलवाद्यांनी जे आरोप केले, त्याची चौकशी गृहविभाग करीत आहे. सुरजागडची लोहखनिज खाण रद्द करावी आणि ते का गरजेचे आहे, ही बाब गृहविभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसे पाहिले तर सुरजागडच्या लोहखनीज खाणीशी, ती सुरू किंवा बंद होण्याशी माझा काही संबंध नाही. लोह खनिज खाणीच्या मालकांशीही माझा काही संबंध नाही. बस रोजगार निर्माण व्हावा, येवढीच भूमिका असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

भाजपचे नेते एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासाठी ओरडत आहे. सत्तेत होते तेव्हा का नाही केले विलिनीकरण? तेव्हा तर हे विलिनीकरण होऊ शकत नाही, असे त्यांचे नेते सांगत होते. आज त्यांना एसटी कर्मचाऱ्यांचा येवढा पुळका का आला, असा प्रश्‍न राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विचारला.

न्यायालयाच्या माध्यमातून संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये राज्य सरकारला नक्कीच यश येईल. त्याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी मधला मार्ग काढण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू आहेत. परंतु, विरोधी पक्षातील नेते कर्मचाऱ्यांना चिथावीत आहेत. त्यामुळे संप चिघळत चालला आहे. विरोधी पक्ष प्रवाशांना वेठीस धरत आहे. सरकारच्या प्रयत्नांना विरोधी पक्षाकडून खीळ घालण्‍याचे काम सुरू आहे. त्यामुळेच राज्यावर ही परिस्थिती ओढवली असल्याचे मंत्री वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा: रश्मी देसाईचा ट्यूब ब्रामध्ये बोल्ड फोटोशूट

एसटी महामंडळाचा संप चिघळतो आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कमी आहे. पगार वाढवण्याची आवश्यकता आहे, असे असले तरी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना वेठीस धरू नये. संपावर सन्मानपूर्वक तोडगा काढण्याचे आमचे प्रयत्न आताही सुरू आहे. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याची आणि मार्ग काढण्याची आमची तयारी आहे, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

loading image
go to top