धोक्याची घंटा : मुलांसाठी ५ हजार खाटांची गरज; तिसऱ्या लाट थोपविणे गरजेचे

धोक्याची घंटा : मुलांसाठी ५ हजार खाटांची गरज; तिसऱ्या लाट थोपविणे गरजेचे

नागपूर : कोरोना विषाणूच्या (coronavirus) स्वरुपात बदल झाल्यानंतर दुसऱ्या लाटेने मध्य भारताचे मेडिकल हब असलेल्या नागपुरातील सरकारी असो की खासगी संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. खाटा, औषधी आणि ऑक्सिजनचा तुटवडा (Lack of oxygen) निर्माण झाला. दुसरी लाट थोपविण्यासाठी आरोग्ययंत्रनेची लक्तरे वेशीला टांगल्यानंतर आता तिसरी लाट (The third wave) धडकणार आहे. ही लाट मुलांसाठी घातक असल्याने आतापासूनच उपाययोजना करणे आवश्यक आहे. संभाव्य धोका पाहता शहरात मुलांसाठी ५ हजार खाटांची गरज असून जम्बो पेडियाट्रिक कोविड सेंटर उभारण्याची नितांत आवश्यकता आहे. (Need 5,000 beds for children Nagpur corona news)

तिसऱ्या लाटेचा ० ते १८ वर्षे वयातील मुलांमध्ये होणारे कोरोनाचे संक्रमण रोखण्याचे आव्हान आता आरोग्य यंत्रणेपुढे आहे. हे आव्हान पेलण्यासाठी सरकारी आणि खासगी रुग्णालयांत पेडियाट्रिक कोविड सेंटर उभारून सुमारे ५ हजार खाटांची सोय करावी लागणार असल्याचे शहरातील बालरोग तज्ज्ञांशी साधलेल्या संवादातून पुढे आले.

धोक्याची घंटा : मुलांसाठी ५ हजार खाटांची गरज; तिसऱ्या लाट थोपविणे गरजेचे
संतापजनक घटना : १३ वर्षीय मुलीवर वृद्धाचा बलात्कार; नागरिकांनी केली धुलाई

नागपूरसह विभागीय स्तरावरील लहान मुलांच्या कोविड उपचाराचा प्रोटोकॉल तसेच प्रशिक्षणाच्या नियोजनासाठी बालरोगतज्ज्ञांचा समावेश असलेला टास्क फोर्स विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी तयार केला आहे. यात डॉ. उदय बोधनकर, डॉ. सतीश देवपुजारी, डॉ. दीप्ती जैन, डॉ. कुश झुनझुनवाला, डॉ. मिनाक्षी गिरीश, डॉ. विनिता जैन यांचा समावेश आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या लक्षात घेता १० लाख लहान मुले आहेत. तर शहरात केवळ ५०० बालरोग तज्ज्ञ आहेत. ही संख्या तोकडी असल्याचे आरोग्य यंत्रणेला कळून चुकले आहे. यामुळे मुलांमध्ये संक्रमण वाढल्यास नागपुरातील आरोग्य यंत्रणा त्यासाठी सज्ज असेल, असा विश्वास प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ तथा टास्क फोर्स सदस्य डॉ. उदय बोधनकर यांनी व्यक्त केले केले.

धोक्याची घंटा : मुलांसाठी ५ हजार खाटांची गरज; तिसऱ्या लाट थोपविणे गरजेचे
शेतात क्रेनने काम करीत होते आई-मुलगा; ३० फूट खोल विहिरीत बसला होता काळ

१० लाख लहान मुलांपैकी ९० टक्के मुलांना कोरोनाचा त्रास होणार नाही. १० टक्के मुलांना भीती आहे. यातील ५ टक्के अर्थात ५० हजार मुलांमध्ये गंभीर लक्षणे दिसतील. मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढले तरी ५० हजार मुलांच्या तुलनेत १० टक्के खाटांचे नियोजन पेडियाट्रिक कोविड सेंटर उभारून आरोग्य यंत्रणेला करावे लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

पेडियाट्रिक व्हेंटिलटेरची गरज

तिसऱ्या लाटेची परिस्थिती आलीच तर लहान मुलांवरील उपचाराची व्यवस्था उभारावी लागणार आहे. अशा स्थितीत नागपूरसारख्या मेडिकल हब असलेल्या शहरात पन्नास देखील पेडियाट्रिक व्हेटिलेटर सद्या असतील की नाही, हे सांगता येत नाही. किमान पाचशेवर पेडियाट्रिक व्हेंटिलेटरची गरज शहराला भासणार आहे. मेयो, मेडिकल, एम्स तसेच डागामध्ये उभारण्यात येणाऱ्या पेडियाट्रिक कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात पेडियाट्रिक व्हेंटिलेटरची गरज भासणार आहे. नवजात अर्भक सेंटरमध्ये न्युओनेटल व्हेंटिलेटरची सोय करावी लागणार आहे. यासंदर्भात अभ्यास करून त्यावरील खर्चाचा तसेच उपाययोजनांचा अहवाल टास्कफोर्सकडून प्रशासनाला सादर करण्यात येणार आहे.

धोक्याची घंटा : मुलांसाठी ५ हजार खाटांची गरज; तिसऱ्या लाट थोपविणे गरजेचे
रविवारपासून कडक लॉकडाउन, वैद्यकीय सेवा वगळून किराणा भाजीपाल्यासह सर्वच बंद

असे उभारता येतील पेडियाट्रिक कोविड सेंटर

मेडिकलमध्ये ५०० खाटा

मेयोमध्ये ५०० खाटा

एम्समध्ये ५०० खाटा

डागामध्ये १०० खाटा

खासगीतील २००० खाटा

मुलांनी अन्नाकडे दुर्लक्ष करणे, कमी जेवण करणे हे कोरोनाचे लक्षण असू शकते. पण मुलं लवकर बरी होतात. मोठ्यांप्रमाणे लहान मुलांवर आयसीयूमध्ये ॲडमिट करायची वेळ येत नाही. ताप, कोरडा खोकला, घसा खवखवणं, धाप लागणं ही सामान्य लक्षणं असली तरी लहान मुलांमध्ये पोट बिघडणं, उलट्या होणं, डोकेदुखी, बेशुद्ध पडणं, सतत चिडचिड करणं अशी बदललेली लक्षणं दिसू शकतात. अशावेळी पालकांनी रागावू नये. त्यांच्याशी सकारात्मक संवाद साधावा. (Need 5,000 beds for children Nagpur corona news)
- डॉ. उदय बोधनकर, बालरोगतज्ज्ञ तसेच टास्क फोर्स सदस्य, नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com