Needle Free Injections: सुईविरहित इंजेक्शनमुळे बालकांची भीती होणार दूर; डॉ.अविनाश गावंडे यांचा विश्वास, लसीकरणामध्ये वाढतोय वापर
Nagpur News: नागपूरमध्ये आता लहान मुलांसाठी सुईविरहित इंजेक्शन सुरू झाले असून, डॉ. गावंडे यांनी त्याचा वापर आरंभ केला आहे. ही तंत्रज्ञानाधारित प्रणाली वेदनारहित असून संसर्गाचा धोका कमी करते.
नागपूर : लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच इंजेक्शन म्हटले की भीती वाटते. परंतु आता ही भीतीच दूर होणार आहे. याचे कारण आता उपचारासाठी इंजेक्शन तर डॉक्टर देतील. परंतु ते सुईविरहित (नीडल फ्री इंजेक्शन) असणार आहे.