नागपूर - मनात डॉक्टर होण्याची जिद्द असली तर काहीही साध्य होत असते. भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातून आलेल्या मोलीन राऊत याने अशाच जिद्दीच्या बळावर नीटमध्ये अनुसूचित जातीतून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. मोलीनचे वडील हे लाखनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर फार्मसी ऑफीसर म्हणून कार्यरत आहेत.