
Nagpur Crime
sakal
कामठी : नवीन कामठी पोलिस हद्दीतील नेरी गावात जुन्या वैमनस्यातून बुधवारी रात्री २७ वर्षीय विवेक रमेश तांडेकर याचा लोखंडी रॉडने निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी उपसरपंच देविदास उर्फ देवा बारशू वंजारी (वय ४२) आणि केशव सुकलाल गिरी (३३), तसेच साहिल प्रमोद घाटोडे (१८) यांना अवघ्या चार तासांत अटक केली.