esakal | कधी संपणार कोरोनाचं मृत्यूचक्र? नागपूर जिल्ह्यात आज तब्बल ७५ रुग्णांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कधी संपणार कोरोनाचं मृत्यूचक्र? नागपूर जिल्ह्यात आज तब्बल ७५ रुग्णांचा मृत्यू

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नागपूर : गेल्या महिन्यापासून राक्षसी वेगाने वाढत असलेल्या कोरोना विषाणूचा विळखा घट्ट होत असून शुक्रवारी एकाच दिवशी ७५ जण कोरोनाबळी ठरले. तर दिवसभरात नव्याने ६ हजार १९४ बाधितांची भर पडली. त्यामुळे आतापर्यंतच्या मृत्यूचा आकडा ६ हजार १०९ वर पोहचला आहे. तर बाधितांची संख्या ३ लाख ९ हजार ४३ झाली आहे. हे सारे दृष्य बघत असणाऱ्या प्रशासनाकडून मात्र सामान्य जनतेला समाधान मिळेल असे काहीच होताना दिसत नाही.

हेही वाचा: "मामा, अपने को कूछ नही होता बे"; हा Attutide ठेवा खिशात: एका कोरोनाग्रस्ताचं भावनिक पत्र

बाधित वाढत असल्याने रुग्ण खाटांसाठी जीव मुठीत घेऊन या रुग्णालयातून त्या रुग्णालयात चकरा मारत आहेत, वाटेतच कोरोनाने जीव जात आहेत, ही जीव हानी थांबवण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. शुक्रवारी २५ हजार ५७३ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यापैकी केवळ १३ हजार २९७ या आरटीपीसीआर चाचण्या झाल्या आहेत.

उर्वरित सर्व चाचण्या रॅपिड ॲन्टिजेन झाल्या आहेत. नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण भागातील कोरोनाची परिस्थिती आता नियत्रंणाबाहेर गेली आहे. गंभीर संवर्गातील रुग्णांना खाटा मिळत नसल्याने मृत्यूचा टक्का वाढत आहेत. दिवसभरात शहरात३७ तर ग्रामीणमध्ये ३१ जण कोरोनाने दगावले आहेत. तर जिल्ह्याबाहेरील ७ जणांचा समावेश आहे.

हेही वाचा: वर्दळीच्या बाजारांमध्ये आता सम-विषम पॅटर्न; कोणत्या झोनमधील दुकानं कधी राहतील सुरु; जाणून घ्या

दिवसभरात तब्बल ५ हजार ८९४ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची एकूण संख्या २ लाख ३८ हजार ५९९ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७.६० टक्क्यांवर आले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ