esakal | नागपुरात कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल ४ लाख पार; आज नव्या ७,४९६ रुग्णांची भर

बोलून बातमी शोधा

नागपुरात कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल ४ लाख पार; आज नव्या ७,४९६ रुग्णांची भर
नागपुरात कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल ४ लाख पार; आज नव्या ७,४९६ रुग्णांची भर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात येत असल्याने सद्या दोन दिवसांपासून कोरोनाचा दर कायम आहे. हा दर खाली येण्याची शक्यता असून त्यासाठी कडक निर्बंध लादले आहेत. आज जिल्ह्यात २४ तासांत ८९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर ७ हजार ४९६ नवीन बाधितांची भर पडली. दोन दिवसांपासून आंशिक दिलासा मिळत आहे. मात्र नव्याने आढळून येणाऱ्या बाधितांमुळे आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या लाख पार झाली आहे.

गुरूवारी शहरात दिवसभर्यात ४९ तर ग्रामीण भागात ३३ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्याबाहेरील ७ असे एकूण ८९ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे शहरातील आजपर्यंत कोरोनाबाधितांच्या मृत्यूची शहरातील संख्या ४ हजार ४४१, ग्रामीण १ हजार ८१४ झाली आहे. जिल्ह्याबाहेरील १ हजार ४५ अशी एकूण ७ हजार ३०० झाली आहे.

शहरात २४ तासांत ४ हजार ४२२ तर ग्रामीण ३ हजार ६७ आणि जिल्ह्याबाहेरील ७ असे एकूण ७ हजार ४९६ नवीन बाधित आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ लाख ९० हजार ६५३ झाली आहे. तर ग्रामीण भागात १ लाख ९ हजार ४४६ बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्याबाहेरील १ हजार २२७ अशी एकूण ४ लाख १ हजार ३२६ कोरोना रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. दिवसभर्यात शहरात १९ हजार १२८, ग्रामीणला ७ हजार ८४ अशा एकूण २६ हजार २१२ संशयीतांची चाचणी झाली आहे. आतापर्यंत २२ लाख ५३ हजार ३९ चाचण्या झाल्या आहेत. यापैकी १५ लाख ४३ हजार ७६३ आरटी पीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर ७लाख ९२ हजार २७६ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत.

कोरोनामुक्तांचा टक्का वाढला

शहरात दिवसभरात ४ हजार ५७६ तर ग्रामीण भागातील २ हजार ४०८ अशा एकूण ६ हजार ९८४ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या २ लाख ३९ हजार ७७१ तर ग्रामीण भागातील ७६ हजार ६२८ अशी एकूण ३ लाख १६ हजार ३९९ व्यक्तींवर पोहचली आहे. आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण ७९.१० टक्क्यांवर पोहचली आहे.

जिल्ह्यात ७७ हजार कोरोनाबाधित

सद्या शहरात ४६ हजार १५० तर ग्रामीण भागात ३१ हजार ४७७ असे एकूण जिल्ह्यात ७७ हजार ६२७ सक्रीय कोरोनाबाधित आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातील ६८ हजार ३८१ रुग्णांवर गृह विलगिकरणात उपचार घेत आहेत. तर गंभीर संवर्गातील ९ हजार २४६ रुग्णांवर मेयो, मेडिकलह विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ