Nagpur : रोकडे ज्वेलर्समध्ये नवीन दागिन्यांची क्षेणी उपलब्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

रोकडे ज्वेलर्समध्ये नवीन दागिन्यांची क्षेणी उपलब्ध

नागपूर : शुद्धता, नावीन्यपूर्ण कलात्मकता आणि पारदर्शक व्यवहारामुळे ग्राहकांचा ओढा रोकडे ज्वेलर्सकडे वाढू लागला आहे. दागिने निर्मितीची आधुनिक पद्धतीमुळे रोकडे ज्वेलर्सने ग्राहकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. लक्ष्मीनगर, महल, इतवारी, एअरपोर्ट अशा चार शाखा असून सर्व शोरूममधील दागिने ग्राहकांच्या पसंतीत उतरत आहे.

रोकडे ज्वेलर्सच्या आभूषणांमध्ये नेहमीच वैविध्यपूर्णता आढळते. पारंपरिक, आधुनिक आणि सर्वच क्षेणीचे दागिने मिळण्याचे एकमेव स्थान म्हणून नावारूपास आले आहे. आकार, वजन आणि रचना(डिझाईन्स) असलेल्या टेम्पल ज्वेलरी, सुवर्ण अलंकार, चांदीचे अलंकार, हिरे, नवग्रह राशीरत्ने आदी दागिन्यांची उपलब्धता हे खास वैशिष्ट्य आहे. ही परंपरा जपतच आज ग्राहक आणि रोकडे ज्वेलर्समध्ये उत्तम नाते निर्माण झाले आहे.

ग्राहकांचा विश्वास हेच आमचे आभूषण आहे. याच विश्वासाचे भान ठेवून ''रोकडे ज्वेलर्स'' नेहमीच ग्राहकांचे हित जपत आले आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आकर्षक वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांचे कलेक्शन सादर केले होते. त्यामुळेच दिवाळीच्या मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी ग्राहक गर्दी करताना दिसले, सोबतच लवकरच चालू होणाऱ्या लग्नसोहळ्यासाठी देखील दागिने खरेदीसाठी देखील आताच प्राधान्य दिले जात आहेत. दिवाळीनिमित्त विशेष ऑफर आणि आकर्षक ज्वेलरी कलेक्शनचा फायदा नागपूरकरांना घेतला. त्यामुळेच ही दिवाळी अजूनच चमकदार बनविली असा दावा संचालकांनी केला आहे.

loading image
go to top