

NMRDA Land Acquisition
esakal
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘आंतरराष्ट्रीय व्यापार व वित्तीय केंद्र’ (आयबीएफसी) म्हणून विकसित होत असलेल्या ‘नवीन नागपूर’ प्रकल्पासाठी आतापर्यंत ५०९.४० एकर जमीन एनएमआरडीए ताब्यात आली असून, ११८ दस्तांची नोंदणी पूर्ण झाली आहे. या बदल्यात शेतकऱ्यांना १२०५.५६ कोटी देण्यात आले आहे हिंगणा तालुक्यातील मौजा गोधनी (रिठी) आणि लाडगाव (रिठी) येथे सुमारे १, ७१० एकर क्षेत्रावर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात आहे.