

Nagpur to Become Global IBFC Hub as Land Acquisition Reaches Final Stage
sakal
नागपूर: हिंगणा तालुक्यातील मौजा गोधनी (रिठी) आणि लाडगाव (रिठी) येथे साकारणाऱ्या ‘नवीन नागपूर’ प्रकल्पाला आता वेग आला आहे. तब्बल १ हजार ७१० एकर क्षेत्रावरील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी खासगी वाटाघाटीतून भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आतापर्यंत ७१ एकर जमिनीची खरेदी पूर्ण झाली आहे. दस्त नोंदणीसह शेतकऱ्यांना १३० कोटी रुपयांवर मोबदला वितरित करण्यात आला आहे.