नागपूर : जुने वर्ष संपून नववर्ष सुरू झाल्यानंतर सर्वांनाच उत्सुकता असते ती नवीन वर्षाची दिनदर्शिका बघण्याची. त्यातील सणवार, वाढदिवस आणि येणाऱ्या सार्वजनिक सुट्या प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो..२०२५ हे वर्ष असेच काहीसे मजेशीर आहे. या वर्षातील तारखा व दिवस हे १९४७ च्या इंग्रजी दिनदर्शिकेशी मिळते-जुळते आहेत. अकरा वर्षांनंतर पुन्हा हा योग जुळून आल्याची माहिती, अंकगणिततज्ज्ञ व तीन हजार वर्षांचे कॅलेंडर तोंडपाठ करण्याचा विश्वविक्रम करणारे सुभाष दाभिरकर यांनी दिली..दाभिरकर यांच्या मते, १९४७ आणि २०२५ ची दिनदर्शिका जवळपास एकसारखी आहे. १९४७ मध्ये स्वातंत्र्यदिन अर्थात १५ ऑगस्ट शुक्रवारी आला होता. यंदाही १५ आॅगस्ट शुक्रवारीच आहे. इतकेच नव्हे तर १९०२, १९१३, १९१९, १९३०, १९४१, १९५२, १९५८, १९६९, १९७५, १९८६, १९९७, २००८, २००३ आणि २०१४ या वर्षांतील तारखा व वारदेखील जवळपास सारखेच असल्याचे त्यांनी सांगितले..पाच सुट्यांवर संक्रांतनववर्षात चार शासकीय सुट्या रविवारी आल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या सुट्यांवर संक्रांत आली आहे. यात २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन), ३० मार्च (गुढीपाडवा),६ एप्रिल (रामनवमी) आणि ६ जुलैचा (मोहरम) समावेश आहे. याशिवाय २ ऑक्टोबरला दसरा आणि महात्मा गांधी जयंती एकाच दिवशी आल्याने यातील ही एक सुटी बुडाली आहे..याशिवाय येणाऱ्या वर्षामध्ये एप्रिल महिन्यात सरकारी नोकरदारांना ता. १२ (शनिवार), ता. २३ (रविवार) आणि ता. १४ (सोमवार) आंबेडकर जयंती या दिवशी सलग तीन सुट्या आल्या आहेत. या जोडसुट्यांमुळे कर्मचाऱ्यांना सहली, कौटुंबिक कार्यक्रम व अन्य कामांचे नियोजन करणे शक्य होणार आहे. तसेच जानेवारी आणि जून महिन्यात एकही शासकीय सुटी नसल्याचे त्यांनी सांगितले..असे असणार सुट्यांचे नियोजनमार्चमध्ये तीन, तर एप्रिल महिन्यात चार शासकीय सुट्याएप्रिल महिन्यात सलग तीन सुट्याजानेवारी व जून महिन्यात मात्र एकही शासकीय सुटी नाहीएकमेव अंगारकी चतुर्थी १२ ऑगस्टलानववर्षात चार श्रावणी सोमवारतीन हजार वर्षांची.Jalna Crime : पोलिसांनी पंधरा लाख घेतल्याची तक्रार; पैशांचा पाऊस प्रकरण , चौकशीनंतर दाखल होणार गुन्हा .दिनदर्शिका तोंडपाठवरुड तालुक्यातील टेंभुरखेडा या छोट्याशा गावात राहणारे दाभिरकर हे अंकगणिततज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असून, त्यांची अलौकिक बुद्धिमत्ता व दांडग्या स्मरणशक्तीची पंचक्रोशीत चर्चा आहे. दैवी देणगी लाभलेले दाभिरकर चुटकीसरशी आकडेमोड करतात. तब्बल तीन हजार वर्षांची दिनदर्शिका व दोन हजारांवर भ्रमणध्वनी क्रमांक त्यांचे तोंडपाठ आहेत. हा विश्वविक्रम म्हणूनही नोंदविला गेला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.