

नागपूर - यशोधरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वांझरा ले-आउट भागात एका दिवसाची नवजात मुलगी बेवारस स्थितीत आढळली. ही घटना सोमवारी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अनैतिक संबंधांतून जन्मलेल्या मुलीला रस्त्यावर फेकून दिल्याची चर्चा परिसरात होती. पोलिसांनी बेवारस सोडणाऱ्या पालकांवर गुन्हा नोंदविला आहे.