
अभिमन खराबे
कुही : आईच्या ममतेची हजारो उदाहरणे आपल्या आसपास सापडतात. मात्र, नवजात बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या एक दिवसात नालीत फेकणाऱ्या आईला काय म्हणावे, ‘माता न तू वैरिणी’, या उक्तीचा प्रत्यय यावा, असा संतापजनक प्रकार तालुक्यातील मांढळ येथे रविवारी (ता.१५) समोर आला. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने जनमानस पुरते हादरले आहे.