esakal | नागपुरात बाजारपेठा राहणार खुल्या, आता फक्त रात्रीची संचारबंदी
sakal

बोलून बातमी शोधा

night curfew will imposed from first april in nagpur corona update

पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या बैठकीत लॉकडाऊनबाबत कुठलाचा निर्णय घेण्यात आलेला नाही. फक्त लसीकरण आणि इतर उपाययोजनांवर भर देण्यात आला.

नागपुरात बाजारपेठा राहणार खुल्या, आता फक्त रात्रीची संचारबंदी

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : शहरात करोनाचा वाढता प्रकोप रोखण्यासाठी चार वाजतानंतर बाजारपेठा बंद ठेवण्याचा घेतलेला निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार शहरात फक्त रात्री आठ ते सकाळी सात यावेळेत संचारबंदी राहणार आहे. 

पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या बैठकीत लॉकडाऊनबाबत कुठलाचा निर्णय घेण्यात आलेला नाही. फक्त लसीकरण आणि इतर उपाययोजनांवर भर देण्यात आला. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, सर्व आमदार महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, विभागीय आयुक्त संजीव कुमार आदी सर्व शीर्षस्थ अधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा - सलग पाचव्या दिवशीही ५० पेक्षा अधिक कोरोनाबाधितांचे बळी, आज २८८५ नवे रुग्ण

विशेष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप सर्वच पक्षांचा लॉकडाऊनला विरोध आहे. लॉकडाऊन परवडणारे नसल्याचे वारंवार नेते आपल्या वक्तव्यामधून सांगत आहेत. पालकमंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केलेल्या चार वाजेपर्यंत बाजारपेठा बंदची मुदत संपली आहे. ते आजच्या बैठकीत याविषयी पुढील निर्णय जाहीर करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र आजच्या बैठकीत लॉकडाऊन, बाजारपेठा बंद वा वेळेच्या मुदतीबाबत कोणीच स्पष्ट भूमिका मांडली नाही. महापौर दयाशंकर तिवारी यांनी बैठकीत लॉकडाऊनबाबत चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. 

हेही वाचा - सावधान! गृहविलगीकरणातील कोरोना रुग्णांवर करडी नजर; वर्धा नगरपालिकेने सुरू केला टोल फ्री क्रमांक 

पालकमंत्री यांनी घातलेल्या बाजारपेठा बंदच्या निर्णयानंतरही नागपूर शहरात करोना रुग्णांची संख्या घटण्याऐवजी वाढली आहे. त्यामुळे आता लॉकाडाऊन ऐवजी काँट्रॅक ट्रेसिंग आणि लसीकरणावर प्रशासनाच्यावतीने भर दिला जाणार आहे. 
 

loading image