
नागपूर : मानकापुरातील पिटेसुर झेंडा चौक येथील बुद्धविहाराजवळील घरासमोर खेळत असलेल्या नऊ वर्षीय मुलीला कारने चिरडले. ही घटना बुधवारी (ता.१६) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली.