
नागपूर : रस्त्यावरचे अपघात कमी करण्यासाठी नव्या पिढीला वाहतूक साक्षर करणे आवश्यक आहे. त्यासाठी शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये वाहतूक सुरक्षेचा समावेश केला पाहिजे. तसेच याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सेलिब्रिटींनी सहभाग घेतला पाहिजे, असे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.