

Nitin Gadkari Reviews Nag River Project
esakal
नागपूर: अमृत योजनेच्या नावाखाली नागपूरकरांना खड्ड्यांचा नरक दाखविणाऱ्या यंत्रणेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रविवारी (ता. ९) चांगलेच संतापले. नागनदी प्रकल्पात रस्ते पूर्ववत न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना थेट निलंबित करा आणि कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करा, असा आक्रमक इशारा देत त्यांनी प्रशासनाला खडेबोल सुनावले आहेत.