esakal | नागपुरात टीडब्ल्यूटी तंत्रज्ञानाचा प्रायोगिक तत्त्वावर वापर
sakal

बोलून बातमी शोधा

नागपुरात टीडब्ल्यूटी तंत्रज्ञानाचा प्रायोगिक तत्त्वावर वापर

नागपुरात टीडब्ल्यूटी तंत्रज्ञानाचा प्रायोगिक तत्त्वावर वापर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अल्ट्रा थीम व्हाईट टॉपिंग (टीडब्ल्यूटी) (Ultra Theme White Topping) या तंत्रज्ञानाचा नागपूर येथे पहिल्यांदाच प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येत आहे. हा रस्ता १३.८५ किलो मीटर लांबीचा (Road work) आहे. या रस्त्यावर १२८ कोटी २८ लाख रुपये खर्च होणार आहे. हा सिमेंट मार्ग चोवीस महिन्यांत पूर्ण करायचा आहे. या रस्त्यावर पातळ काँक्रिटच्या म्हणजेच १८० मी. मी. जाडीचा वापर करण्यात येणार आहे. याला आयआरसीची मान्यता आहे. रस्त्याच्या एकूण खर्चात कशा पद्धतीने बचत करता येईल व नाविन्यपूर्ण पद्धतीने रस्ता बनवता येईल या उद्देशाने सुरू असलेल्या कामांची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Land Transport Minister Nitin Gadkari) यांनी घेतली. (Nitin-Gadkari-said-the-new-technology-will-speed-up-the-work-of-cement-roads)

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हिंगणा रोडवर टीडब्ल्यूटी (अल्ट्रा थीम व्हाईट टॉपिंग) या तंत्रज्ञानाचा वापर करून पहिल्यांदाच प्रायोगिक तत्त्वावर १८० मी. मी. जाडीच्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानामुळे खर्चात बचत होऊन बांधकामाचा अवधी कमी होणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

हेही वाचा: चंद्रपूर : गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

टीडब्ल्यूटी या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हिंगणा टी पॉईंट ते प्रियदर्शनीपर्यंत १३.८५ किलो मीटर लांबीचा सिमेंट रस्ता जागतिक बँक प्रकल्प विभागातर्फे बांधण्यात येत आहे. या नवीन तंत्रज्ञानाची पाहणी नितीन गडकरी यांनी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख, कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे, मुंबईच्या साकेत शहा व पारेख या कंत्राटदार कंपनीतर्फे राजनारायण जैस्वाल उपस्थित होते.

प्रारंभी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख यांनी नवीन पद्धतीने प्रायोगिक तत्त्वावर बांधण्यात येणाऱ्या या रस्त्यासाठी १६३ कोटी ४६ लाख रुपये तांत्रिक मान्यता असल्याचे सांगितले. या रस्त्याच्या बांधकामासाठी संबंधित कंत्राटदाराकडून १२८ कोटी २८ लाखांचा करारनामा करण्यात आला असून, १० मार्च २०१९ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे. या बांधकामासाठी चोवीस महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. सप्टेंबर २०२१ पर्यंत बांधकाम करण्याचा कालावधी विहित करण्यात आला आहे.

(Nitin-Gadkari-said-the-new-technology-will-speed-up-the-work-of-cement-roads)

loading image