
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि अनागोंदीवर परखड मत व्यक्त केलं आहे. शिक्षकांच्या नियुक्ती आणि मंजुरीसाठी पैशांचा खेळ चालतो, असे सांगत त्यांनी विदर्भातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्यावर अप्रत्यक्षपणे बोट ठेवले. एका खासगी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर भाष्य केले आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी काय आवश्यक आहे, यावरही प्रकाश टाकला.