
नागपूर : परदेशी नागरिकांसाठी राज्यामध्ये ‘डिटेन्शन कॅम्प’ नसल्याचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गांभीर्याने घेतला आहे. यावर जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. एका प्रकरणात नायजेरियन नागरिकाला ‘डिटेन्शन कॅम्पमध्ये ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर शासनातर्फे ही बाब समोर आली.