
नागपूर : तृतीयपंथीय असल्याची जाणीव होताच लहान वयातच घर सुटते. कोवळ्या मनावर घर सोडल्याचा घाव घातला जातो. आई-वडील, नातेवाईक आणि मित्रांकडून अवहेलना होते. आश्रय मिळतो तो तृतीयपंथीयांच्या वस्तीत. मात्र त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन योजनांची घोषणाच करीत आहे. पाच वर्षांत त्यांना घरकुल मिळाले ना मानधन. आता पुन्हा सरकारने त्यांच्या मंडळाची पुनर्रचना केली आहे.