esakal | नागपुरात खाटा अन् औषधांचा तुटवडा नाही, मेडकलसह एफडीएची उच्च न्यायालयात माहिती

बोलून बातमी शोधा

court

नागपुरात खाटा अन् औषधांचा तुटवडा नाही, मेडकलसह एफडीएची उच्च न्यायालयात माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरामध्ये रुग्णांसाठी खाटा आणि आवश्‍यक औषधी (रेमडेसिव्हिर वगळता)चा तुटवडा नसल्याची माहिती मेडीकल आणि अन्न व औषध प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिली. कोरोनाग्रस्त रुग्णांना खाटा उपलब्ध नसल्याची दखल घेत नागपूर खंडपीठाने जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.

हेही वाचा: धक्कादायक! नागपुरात महिनाभरात तब्बल २२८२ कोरोनाबळी; ग्रामीण भागातही रुग्णसंख्या अधिक

या प्रकरणावर न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांच्या समक्ष सुनावणी झाली. तत्पूर्वी, रेमडेसिव्हिरच्या जिल्हानिहायपुरवठ्या बाबत शासनातर्फे माहिती दाखल करण्यात आली. यामध्ये शहरातील रेमडेसिव्हिरच्या तुटवड्याची आणि वितरणा दरम्यान झालेल्या भेदभावावर खेद व्यक्त केला. हा पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून प्रशासन पावले का उचलत नाही, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली. यासाठी संबंधित विभागाला विविध आदेश दिले.

तसेच, वेस्टर्न कोलफिल्ड्स लि. (वेकोली)ने नागपूरसह चंद्रपूर येथे ऑक्सिजन प्लँट उभारण्यासाठी सामाजिक दायित्वातून २ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती न्यायालयाला दिली. न्यायलयीन मित्र अ‌ॅड. श्रीरंग भांडारकर, राज्य सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील केतकी जोशी, मध्यस्थी अर्जदारांतर्फे अ‌ॅड. एम. अनिलकुमार, आयएमएतर्फे अ‌ॅड. बी. जी. कुलकर्णी यांनी, अ‌ॅड. तुषार मंडलेकर आदींनी बाजू मांडली.