
Differently Abled Janhavi Stands for Science Over Superstition in Powerful Demonstration: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे (अंनिस) टिमकी येथील रा. बा. कुंभारे सभागृहात दोन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. यात दिव्यांग विद्यार्थिनी जान्हवीने स्वतःच्या हातावर कापूर जाळून दैवी चमत्कार नसल्याचे सिद्ध केले.
आदिम संशोधन-अध्ययन मंडळ, अस्तित्व क्रियेशन आणि एज्युकेशन एम्पायरमेंट ऑफ अंडरप्रिव्हिलेज्ड गर्ल्स फाउंडेशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक गौरव आळणे यांनी ‘अंधश्रद्धेची दुनिया.. विज्ञानाची किमया’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यांनी पाण्याने दिवा पेटवणे, मंत्राने होम पेटवणे, हवेतून सोन्याची साखळी काढणे यासारखी रासायनिक आणि भौतिक वैज्ञानिक प्रात्यक्षिके सादर करून अंधश्रद्धेचे खरे स्वरूप उलगडले. विशेष म्हणजे, दिव्यांग विद्यार्थिनी जान्हवीने स्वतःच्या हातावर कापूर जाळून दैवी चमत्कार नसल्याचे सिद्ध केले.
दुसऱ्या शिबिरात विभाग प्रमुख डॉ. कविता मते यांनी ‘स्वत:ला जाणूया’ या विषयावर मुलींना मार्गदर्शन केले. तारुण्यात पदार्पण करताना मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल आणि काही वेळा जवळच्या नातेवाइकांकडून होणारा मानसिक छळ व अत्याचार याबाबत सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
मुलींनी विवेकी जोडीदाराची निवड करणे आणि सजग राहणे यावर त्यांनी विशेष भर दिला. याप्रसंगी ओएनजीसी मुंबईचे सेवानिवृत्त अधिकारी सुभाष सोनकुसरे यांनी दोन्ही शिबिरांना भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यांनी शालेय साहित्यासाठी दहा हजार रुपयांचा धनादेश आयोजक प्रकाश निमजे यांच्याकडे सुपूर्द केला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विष्णू भनारकर, प्रदीप पवनीकर आणि इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.