Nagpur News: नागपूरमध्ये १५ वर्षांपासून पाणी पाइपलाइनची प्रतीक्षा; नागरिकांची झळ; तारकेश्‍वर, स्वामीनगर, सम्राट अशोकनगर व दत्तात्रयनगर वस्तीमध्ये टँकरवर अवलंबून जीव

Nagpur Residents Wait 15+ Years for Water Pipeline: नागपूर शहरातील तारकेश्‍वर, स्वामीनगर, सम्राट अशोकनगर, दत्तात्रयनगर आणि उप्पलवाडी परिसरात नागरिक पंधरा वर्षांपासून पाणी पाइपलाइनची प्रतीक्षा करत आहेत.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: उत्तर नागपुरातील आम्ही नागरिक. तारकेश्‍वर, स्वामीनगर, सम्राट अशोकनगर, दत्तात्रयनगर, उप्पलवाडी परिसरात मागील वीस वर्षांपासून राहतो. आमचे नगरसेवक नळ पाइपलाइनसाठी महापालिकेत वारंवार प्रस्ताव सादर करतात, मात्र प्रशासन भेदभाव करीत असल्याचे दिसते. वस्तीत पाइपलाइन नसताना महापालिका पाणी कर कोणत्या आधारे घेते?, असा सवाल या वस्तीतील नागरिकांनी केला आहे. ही वस्ती आजही टँकरच्या पाण्यावरच अवलंबून आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com