Nagpur :घरातील कचरा भंगारात अन् भंगारातून पुन्हा घरात!

१६४ भंगार विक्रेत्यांना नोटीस : कारवाईचा इशारा; अजब प्रक्रियेला महापालिकेचा चाप
Notice to 164 Scrap Dealers Municipal action waste scrap business
Notice to 164 Scrap Dealers Municipal action waste scrap business sakal

नागपूर : घराघरातून गोळा केलेल्या कचऱ्यातील प्लास्टिक, काचेच्या बॉटल्स, ई-कचरा खाजगी कंपन्यांचे संकलन करणारे कर्मचारी भंगार विक्रेत्यांना विकत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. विशेष म्हणजे अनेक गरीब नागरिक भंगार विक्रेत्यांकडून त्यांना उपयुक्त वस्तू कमी दरात विकत घेतात. त्यामुळे घरातील कचरा भंगारात आणि भंगारातून पुन्हा घरात जात असल्याचे चित्र आहे.

शहरात एजी व बीव्हीजी या दोन खाजगी कंपन्यांमार्फत घराघरातून कचऱ्याची उचल केली जाते. दोन्ही कंपन्यांकडून हजारावर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. हे कर्मचारी दररोज घराघरातून कचरा संकलित करीत आहेत. कचऱ्यामध्ये अनेकदा लोखंडी सळाखी, प्लास्टिक किंवा काचेच्या बॉटल्स, प्लास्टिकच्या जुन्या बादल्या किंवा मग असतात. एवढेच नव्हे अनेक नागरिक घरात पडून असलेल्या जुन्या चप्पल, जोडे आदी वस्तुही कचऱ्यात फेकतात.

खाजगी कंपन्यांचे कचरा संकलन करणारे कर्मचारी कचऱ्यातून वापरायोग्य वस्तू निवडून भंगार विक्रेत्यांना विकत असल्याची बाब पुढे आली. विशेष म्हणजे कचऱ्याची उचल करण्यासाठी महापालिका कोट्यवधी खर्च करीत आहे. त्यामुळे हा कचरा महापालिकेची मालमत्ता आहे. एकप्रकारे संकलन करणारे कर्मचारी महापालिकेची संपत्तीच भंगार विक्रेत्यांना विकत आहेत. ही बाब महापालिकेच्या निदर्शनास आली असून शहरातील १६४ भंगार विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. ‘ही महापालिकेची संपत्ती आहे.

Notice to 164 Scrap Dealers Municipal action waste scrap business
Nagpur : हरविलेल्या राधिकेचा मृतदेहच सापडला; दगडाने ठेचून खून झाल्याचा संशय

कचरा संकलन करणाऱ्यांकडून भंगार खरेदी केल्यास कारवाई करण्यात येईल’, असे नोटीसमध्ये नमूद करण्‍यात आल्याचे उपद्रव शोध पथकप्रमुख वीरसेन तांबे यांनी ‘सकाळ’सोबत बोलताना सांगितले.

खाजगी कंपन्यांनाही इशारा

शहरातील कचरा संकलन करणाऱ्या एजी व बीव्हीजी या कंपन्यांनाही महापालिकेने नोटीस बजावली आहे. कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून भंगार विक्रेत्यांना कचऱ्यातील साहित्य विकले जात असल्याची बाब महापालिकेने या कंपन्यांच्या लक्षात आणून दिली. अशा कर्मचाऱ्यांवर कंपन्यांनी कारवाई करावी, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Notice to 164 Scrap Dealers Municipal action waste scrap business
Nagpur News : नागपूर शहरात सावली सोडतेय साथ! वृक्ष छायेच्या क्षेत्रात घट

कंपन्यांचेही नुकसान

कंपन्यांना महापालिका टनानुसार पैसे देत आहे. कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून कचरा गाडीतील साहित्य विकले गेल्यास तेवढेच वजन कमी भरणार, त्यानुसार महापालिकेकडून पैसेही कमी मिळणार, अशाप्रकारे कंपन्यांचेही आर्थिक नुकसान होत आहे. परंतु कंपन्या अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

भंगार विक्रेत्यांना कचरा विकला जात असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे १६४ भंगारविक्रेत्यांना हा कचरा खरेदी करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी नोटीस देण्यात आली आहे. याशिवाय खाजगी कंपन्यांनाही त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.

— डॉ. गजेंद्र महल्ले, उपायुक्त व संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com