
नागपूर : शहरात एमडी तस्करीचे प्रमाण वाढले आहेत. तस्करीत गेल्या दोन वर्षांपासून कुख्यात गुन्हेगारांचा सहभाग वाढल्याने नागपूर पोलिसांचे टेन्शन वाढले आहे. शहरातील बडे गुन्हेगारच एमडी आणि इतर अंमली पदार्थांच्या तस्करीचे सिंडीकेट चालवित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातून गेल्या पाच महिन्यांत ९९ गुन्ह्यांमध्ये १२४ एमडी तस्करांना अटक करण्यात आली आहे.