
नागपूर : बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्यपिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. यामुळे निरोगी राहण्यासाठी आवश्यक असलेल्या जीवनसत्वांसह लोह, खनिज, प्रथिनांचे प्रमाणापेक्षा कमी होत आहे. शहरातील १६ ते १८ या वयोगटातील तरुणींमध्ये हे प्रमाण अतिशय चिंताजनक असून, त्यांची पोषणाची स्थिती चिंताजनक असल्याची धक्कादायक माहिती डॉ. सोनल चावला यांनी केलेल्या संशोधनात पुढे आली आहे.