Nylon Manja Horror rais youth Sustains Severe Neck Injury
sakal
नागपूर - शहरात नायलॉन मांजा प्रतिबंधित असताना त्याची तस्करी जोरात सुरू आहे. त्यातूनच दीपकनगर परिसरात एका युवकाचा नायलॉन मांजाने गळा कापल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली आहे. युवकाला नऊ टाके लागले असून थोडक्यात तो बचावला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.