

Nagpur Nylon Manja Seizure
sakal
नागपूर : मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री आणि साठा करणाऱ्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत, गेल्यावर्षी एक कोटी पाच हजारांचा नायलॉन मांजा जप्त केला. याशिवाय १०२ गुन्हे दाखल करून १२८ आरोपींना अटक केली. नायलॉन मांजाच्या दुष्परिणामांबाबत ‘सकाळ’ने वारंवार वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू आहे.