
नागपूर : महायुतीच्या ‘जंबो’ मंत्रिमंडळ विस्ताराचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असल्याचे राजभवन येथे पाहायला मिळाले. तिन्ही पक्षांनी त्यांच्या पक्षांतील संभाव्य मंत्र्यांना शपथविधीस येण्यासाठी निरोप देण्यास केलेला उशीर, ३९ मंत्र्यांच्या शपथविधीचे नियोजन, राजभवन येथील अपुरी जागा आणि या शपथविधीसाठी संबंधित मंत्र्यांच्या कुटुंबीयांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेली प्रचंड गर्दी यामुळे शपथविधी सोहळ्यात एकच गोंधळ उडाला.