ओबीसींचा आज नवी दिल्लीत घुमणार आवाज

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पुढाकारातून तालकटोरा स्टेडियममध्ये ओबीसीचे सातवे महाअधिवेशन
OBC 7th Convention at Talkatora Stadium
OBC 7th Convention at Talkatora Stadium

नागपूर - राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पुढाकारातून नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये ओबीसीचे सातवे महाअधिवेशन रविवारी आयोजित केले आहे. विदर्भातील शेकडो कार्यकर्ते आणि ओबीसी बांधव त्यासाठी नवी दिल्ली येथे रवाना झाले आहेत. ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, संविधानातील कलमात दुरुस्ती करून रद्द राजकीय आरक्षण पूर्वरत सुरू करावे, लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे, केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करावी आदी २२ मागण्यांकडे केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भगवान कराड, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राज्यांतील ओबीसी नेते मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालुप्रसाद यादव यांचा भव्य सत्कार होणार आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ . बबनराव तायवाडे स्वागताध्यक्ष असतील.

मंडल यात्रेचा आज समारोप

विविध ओबीसी संघटनांच्या वतीने एक ते सात ऑगस्ट या काळात विदर्भातील सात जिल्ह्यांमध्ये आयोजित `मंडल यात्रे`चा समारोप रविवारी नागपूर येथे सेवादल महिला महाविद्यालयामध्ये होणार आहे. या निमित्ताने ओबीसींमधील विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. मंडल आयोगाबाबत जनजागृती या यात्रेतून करण्यात आली. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक उमेश कोर्राम यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com