esakal | युवकासोबत बोलली म्हणून मुलीशी गैरवर्तन; बापाचे कृत्य वाचून तुम्हालाही बसेल धक्का
sakal

बोलून बातमी शोधा

atyachar

पोटच्या मुलीशी गैरवर्तन; बापाचे कृत्य वाचून बसेल धक्का

sakal_logo
By
अमर मोकाशी

भिवापूर (जि. नागपूर) : गावातील युवकासोबत बोलल्याचा राग मनात धरून अल्पवयीन मुलीला धडा शिकविण्याच्या उद्देशाने नराधम बापाने पोटच्या मुलीशी गैरवर्तन केले. ही घटना सोमवारी उघडकीस आली. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम बापाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना २८ ऑगस्टला तालुक्यातील वासी येथे घडली.

बापाच्या कौर्यामुळे मुलीला पोटाच्या खालील भागावर झालेल्या जखमांच्या वेदना असह्य होऊ लागल्याने आईने उपचारासाठी चिमूर येथील शासकीय रुग्णालयात नेले होते. उपचार करणाऱ्या डॉक्टरने जखमांबद्दलचे कारण विचारले असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला. यामुळे सहा आठवड्यांपूर्वी बापाने केलेल्या कृत्याचे बिंग फुटले.

हेही वाचा: सामान्यांच्या ताटातून भाजी गायब; दर दुप्पटीने वाढले

खडसंगी येथील युवकासोबत बोलताना बापाने मुलीला बघितले. यामुळे त्याचा माथा ठणकला व राग अनावर झाला. ही घटना घडली तेव्हा मुलीची आई व भाऊ हे वासी (ता. भिवापूर) येथे मुलीच्या आजोबाकडे गेले होते. रागाच्या भरातच आरोपीसुद्धा मुलीला घेऊन २८ ऑगस्टला वासी येथे आला. याठिकाणी त्याने पोरीचे हातपाय दोरीने बांधून एका खोलीत बंद केले.

कापसाचे बोळे पेट्रोलमध्ये भिजवून तिच्या शरीरावर (गुप्तांगावर) मळले. घटनेनंतर काही काळ मुलीला कोणताही त्रास जाणवला नाही. परंतु, काही दिवसांनंतर पेट्रोलने त्रास व्हायला सुरुवात झाली. ज्या ठिकाणी पेट्रोल मळले होते त्या ठिकाणी जखमा तयार होऊन मुलीला वेदना जाणवू लागल्या होत्या. मुलीच्या तोंडून बापाची कौर्यकथा ऐकताच उपचार करणाऱ्या डॉक्टरने लगेच चिमूर पोलिसांना याबाबत सूचना दिली.

हेही वाचा: नुसता दुधाचा चहा पिताय? जाणून घ्या होणारे नुकसान

घटनास्थळ भिवापूर पोलिस ठाण्यांतर्गतअंतर्गत येत असल्याने चिमूर पोलिसांनी भिवापूर पोलिसांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. रविवारी रात्री उशिरा मुलगी व आईने ठाणेदारांची भेट घेऊन तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी सोमवारी पहाटे आरोपी बापावर गुन्हा नोंदविला. ठाणेदार भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात उमरेड पोलिस ठाण्याच्या साहाय्यक पोलिस निरीक्षक शीतल खोब्रागडे पुढील तपास करीत आहेत. वृत्त लिहेपर्यंत आरोपीला अटक करण्यात आलेली नव्हती. पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केल्याचे समजते.

loading image
go to top