नागपुरात रेकॉर्ड; नीरीतील तपासणीत आढळले ७३ ओमिक्रॉनबाधित| Omicron | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Omicron

नागपुरात रेकॉर्ड; नीरीतील तपासणीत आढळले ७३ ओमिक्रॉनबाधित

नागपूर : देशात एकीकडे कोरोनाचा (coronavirus) उद्रेक होत असताना नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेमध्ये (नीरी) (National Institute of Environmental Engineering) सलाईन गार्गल या जीनोम सिक्वेसिंगच्या तपासणी पद्धतीमध्ये गुरुवारी (ता. १३) ७३ ओमिक्रॉनबाधित (Omicron) आढळले असल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात ओमिक्रॉन बाधितांची संख्या १७५ झाली आहे.

दुसऱ्या लाटेतही डेल्टाच्या तपासणीत राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था (नीरी) सलाईन गार्गल या जीनोम सिक्वेंसिंगची पद्धत तपासणीसाठी वापरत होते. नीरीमध्ये जीनोम सिक्वेसिंग सुरू झाले होते. याचा लाभही होत होता. मात्र, नमुने हैद्राबाद येथे पाठवण्यात येत होते. अलीकडे जीनोम सिक्वेसिंग पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत करण्यात येते. याचे अहवाल मोठ्या प्रमाणात प्रतीक्षेत आहेत.

हेही वाचा: ‘आम्हाला सोबत न घेतल्यास काँग्रेसला दहा जागाही मिळणे कठीण होईल’

मात्र, नीरीतून आलेल्या चाचणीत ७३ नमुने तपासले असता ७३ ही ओमिक्रॉनबाधित (Omicron) आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष असे की ६ जानेवारी रोजी नीरीतून केलेल्या चाचणीत ५१ जण ओमिक्रॉनबाधित आढळले होते. नीरीतील ओमिक्रॉन बाधितांची संख्या १२४ झाली आहे. तर राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतून आतापर्यंत ५१ जणांचे नमुने ओमिक्रॉनबाधित (Omicron) आढळले. अशाप्रकारे आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात एकूण १७५ ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत.

राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतून आलेले ओमिक्रॉन बाधित

 • १२ डिसेंबर - १

 • २३ डिसेंबर - १

 • २७ डिसेंबर - १

 • २९ डिसेंबर - ३

 • ३ जानेवारी - ४

 • ४ जानेवारी- ३

 • ५ जानेवारी- ११

 • ६ जानेवारी- ६

 • ९ जानेवारी- २१

हेही वाचा: अपघातात गेली वाचा; कोरोनाची लस घेतली अन् झाला चमत्कार!

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था

 • ६ जानेवारी - ५१ ओमिक्रॉनबाधित

 • १३ जानेवारी - ७३ ओमिक्रॉनबाधित

Web Title: Omicron National Institute Of Environmental Engineering Coronavirus Nagpur District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top