esakal | नागपुरात दर १० मिनिटाला हलतो पाळणा, वर्षाला ५० हजार दाम्पत्याकडे ‘गुड न्यूज'
sakal

बोलून बातमी शोधा

Born Baby

दर १० मिनिटाला हलतो पाळणा, वर्षाला ५० हजार दाम्पत्याकडे ‘गुड न्यूज'

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर : गेल्या काही वर्षात शहराच्या लोकसंख्येत (nagpur population) मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. रोजगारासाठी खेड्यातून येणारे लोंढे, नागरीकरणामुळे लोकसंख्येत वाढ होत असली तरी वर्षाला ५० हजारांवर नवजात बालकांचीही भर पडत आहे. शहराच्या लोकसंख्येत दर दहा मिनिटाला एकाची भर पडत आहे. (one baby birth in every 10 minutes in nagpur)

हेही वाचा: लिंकवर क्लिक करताच खात्यातून ६६ हजार लंपास, गुन्हा दाखल

गेल्या पाच दशकांत शहराची लोकसंख्या अडीचपटीने वाढल्याचे दिसून येत आहे. लोकसंख्येत दरवर्षी ५० हजारांची भर पडत आहे. यात नवजात बालकांचा मोठा समावेश आहे. मागील २०२० या वर्षात बाळांच्या जन्मात घट झाली असली तरी सहा वर्षात सरासरी दहा मिनिटाला एका बाळाचा जन्म होत असल्याचे महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. १९८१ मध्ये शहराच्या लोकसंख्येने प्रथमच दहा लाखांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर दरवर्षी सातत्याने ५० हजारांवर नागरिकांची संख्या वाढत आहे. शहरात २४ तासांत सरासरी दीडशे कुटुंबांमध्ये एका बालकाचा जन्म होत आहे. तासाला सहा दांपत्यांना नव्या पाहुण्याचे आई-वडिल होण्याचा मान मिळत आहे.

दहा वर्षात सहा लाखांची भर -

२०११ मध्ये शहराची लोकसंख्या २४ लाख ५ हजार ४२१ होती. गेल्या दहा वर्षात प्रति वर्ष ५० हजार चिमुकल्याचा जन्म झाला. त्यामुळे २०११ ते २०२१ या दहा वर्षात शहराच्या लोकसंख्येत सहा लाखांनी भर पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शहराची आताची लोकसंख्या तीस लाखांच्या घरात असल्याचेच गृहित धरले जात आहे.

वर्षनिहाय बाळांचा जन्म -

वर्ष प्रति दिन बाळांचा जन्म

  • २०१५ १५१

  • २०१६ १४८

  • २०१७ १५३

  • २०१८ १५२

  • २०१९ १४८

  • २०२० १२३

loading image
go to top