Talathi Recruitment : तलाठी पदभरतीला एका दिवसाची मुदतवाढ; मंगळवारी रात्री ११.५५ पर्यंत करता येणार अर्ज

सोमवारी १७ जुलै शेवटचा दिवस होता. अशात सकाळी ११ वाजेपासूनच वेबसाईट बंद होती.
One day extension Talathi recruitment applications can be made till 11.55 pm today govt job
One day extension Talathi recruitment applications can be made till 11.55 pm today govt jobsakal

नागपूर : तलाठी पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठी असणारी महाराष्ट्र शासनाची महसूल विभागाची वेबसाईट सोमवारी दिवसभर बंद राहिल्याने उमेदवारांना अर्ज भरता आला नाही. या विषयाबाबत ‘सकाळ’ डिजिटलने ऑनलाईन बातमी प्रकाशित करून शासनाचे लक्ष वेधले.

One day extension Talathi recruitment applications can be made till 11.55 pm today govt job
Talathi Recruitment : राज्यातील तलाठी भरतीच्या चौकशीची मागणी

त्यानंतर सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजता महसूल व वनविभागातर्फे भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त संचालक आनंद रायते यांनी शुद्धीपत्रक काढून एका दिवसाची मुदतवाढ दिल्याचे जाहीर केले.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत तलाठी (गट क) संवर्गातील एकूण ४ हजार ६४४ पदांसाठी अर्ज करण्यासाठी सोमवारी १७ जुलै शेवटचा दिवस होता. अशात सकाळी ११ वाजेपासूनच वेबसाईट बंद होती.

One day extension Talathi recruitment applications can be made till 11.55 pm today govt job
Nagpur : तलाठी पदभरती अर्ज प्रक्रियेत खोळंबा, ऐन शेवटच्या दिवशी वेबसाईट बंद; हेल्पलाईनही हेल्पलेस

अनेक उमेदवारांना अर्ज भरण्यात अडचण जात असल्याची माहिती मिळताच सकाळने या विषयाकडे लक्ष वेधून पाठपुरावा केला. त्यानंतर संध्याकाळी ई-महाभूमी (महसूल व वनविभाग) अतिरिक्त संचालक आनंद रायते यांनी यासंदर्भात मुदतवाढीबाबत शुद्धीपत्रक काढले. त्यानुसार आता तलाठी संवर्गातील रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची मुदत जी १७ जुलै रोजी ११.५५ वा.पर्यंत होती.

ती आता अंतिम दिनांक १८ जुलै रोजी ११.५५ वा.पर्यंत करण्यात आली आहे. तर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षेचे शुल्क भरण्यासाठी २० जुलै रात्री ११.५५ अशी वेळ देण्यात आली आहे. सकाळने केलेल्या पाठपुराव्यामुळे तलाठी पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळाल्याने स्पर्धा परीक्षार्थींकडून आभार मानण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com