Health Care Crisis : एकाच डॉक्टरवर २३ गावांचा डोलारा ! कोदामेंढी येथील प्रकार, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
One Doctor for 23 Villages : कोदामेंढी येथील आरोग्य केंद्रावर एकाच डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली २० ते २५ गावांतील नागरिक आरोग्य तपासणी आणि औषधोपचारासाठी येतात. या आरोग्य समस्येमुळे नागरिकांच्या आरोग्याची स्थिती गंभीर झाली आहे.
कोदामेंढी : परिसरातील वीस ते पंचवीस खेड्यातील रुग्ण कोदामेंढी येथील आरोग्य केंद्रात तपासणी आणि औषधोपचारासाठी येत असतात. नागरिकांना आरोग्याची मुबलक सुविधा स्वस्त मिळावी यासाठी एकीकडे शासनस्तरावर मोठमोठे उपक्रम आणि योजना राबविल्या जात आहे.