Nagpur News : एमएमपी कंपनी स्फोटातील जखमी करण शेंडेचा मृत्यू
Umred Factory Explosion : उमरेडच्या धुरखेडा येथील एमएमपी ॲल्युमिनियम कंपनीत झालेल्या स्फोटात भाजलेल्या करण शेंडे या मजुराचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा सहावर गेला आहे. मंगळवारी त्याने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
नागपूर : उमरेडमधील धुरखेडा येथील एमएमपी ॲल्युमिनीअम कंपनीत झालेल्या स्फोटात भाजलेल्या जखमींपैकी एकाचा मंगळवारी (ता.१५) मृत्यू झाला. यामुळे आता मृतांचा आकडा पाच वरून सहावर पोहोचला आहे.